Thursday 19 February 2015

सह्यभटकंती प्रवासवर्णन

प्रस्तावना:
शिवजयंतीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा!
आज माझ्या गिर्यारोहणाच्या अनुभवांचा आनंद आपल्याबरोबर वाटण्याचा निर्णय घेतला शिवजयंतीच्या मुहूर्तासारखा पवित्र दिन यासाठी दुसरा असू शकत नाही.सह्याद्रीच्या कडे कपारीत communication ची आजच्यासारखी साधने नसताना 'स्वराज्याची' संकल्पना गोरगरीब प्रजेत रूजवून रयतेचे राज्य ऊभारणारा श्री शिवछत्रपतींसारखा राजा जागतिक ईतिहासातही दुर्मीळ! त्याकाळात विविध गड किल्ल्यांचा घाटवाटांचा ऊपयोग आपले राज्य बळकट करण्यासाठी  करणारे व आजही अशक्य वाटावी अशी व्यवस्था निर्माण करणारया महारांजासारख्या जाणत्या राजासमोर आपण आपसुकच मुजरयासाठी झुकावे असे त्यांचे कतृत्व!
अलिकडच्या काळात महाराजांच्या व मावळ्यांच्या पराक्रमाच्या साक्षीदार असणारया सह्याद्रीच्या गडकिल्ले कडेकपारी घाटवाटा यामध्ये गिर्यारोहण करणारांची संख्या वाढतेय व इंटरनेटच्या माध्यमातून ऊत्सुकता वाढवणारी माहीती आवड असणारयांपर्यंत सहजरित्या पोहचतेय.त्याचाच धागा पकडून आपलेही अनुभव थोडे बहुत का असेनात ते मांडावेत अशी कल्पना मनात घोळत होती.माझा लहान भाऊ आणि ट्रेक लिडर प्रशांतच्या सूचनेवरून आजच्या मुहुर्तावर याची सुरूवात करतोय.प्रत्येक माणसाचे विचार वेगऴे, शैली वेगळी, अनुभव वेगळे पण ऊद्देश एकच राजा शिवराय यांच्या कार्याचा जागर व जागतिक वारसा ठेवा असणारया पश्चिम घाटातल्या कडे कपारीत लपलेले सौंदर्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून ते जतन करण्यासाठी प्रयत्नात खारीचा वाटा ऊचलावा.तर मित्रांनो भेटत राहू अधूनमधून विविध गड घाटवाटांच्या प्रवास वर्णना सोबत!
जय शिवराय! जय महाराष्ट्र!

No comments:

Post a Comment